Gram Panchayat - Shenit, Tal. Igatpuri, Dist. Nashik
Sarpanch
सौं वैशाली पोपटराव जाधव
Upsarpanch
श्री राजाराम लक्ष्मण जाधव
Gram Sevak
श्री संदिपान कचरू नेटके
शेणीत हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक सुंदर गाव आहे. हे गाव निसर्गाच्या गोदीत वसलेले असून येथील लोक मुख्यत्वे शेती, पशुपालन आणि छोट्या व्यवसायांत गुंतलेले आहेत. गावातील प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य येथील वैशिष्ट्य आहे.
Shenit is a beautiful village in Igatpuri taluka of Nashik district. Located in the lap of nature, the people here are mainly engaged in agriculture, animal husbandry and small businesses. Ancient temples and natural beauty are the features of this village.
ग्रामपंचायत मार्फत कुपोषण निर्मूलन करणेसाठी अंगणवाडीस आवश्यक साहित्य, पोषण आहार वाटप, VCDC उपक्रम राबवून गाव कुपोषण मुक्त केले.
गावचे सर्व निर्णय ग्रामसभे द्वारेच घेतले जातात.
मुलांमधील विविध सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी विविध स्पर्धा घेतल्या जातात.
ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी मार्फत विविध योजना राबविल्या जातात.
ग्रामविकासात महिलांचा सक्रिय सहभाग घेतला जातो.
१५ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायत स्वनिधी मधून स्मशानभूमी परिसर विकास व दशक्रिया विधी शेडची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
लोकसहभाग तसेच कंपनी CSR निधी मधून अंगणवाडी, मंदिरांसारखी कोटीपेक्षा जास्त रकमेची महत्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
संपूर्ण गावठाण हद्दीत संरक्षित विद्युतीकरण तसेच गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर LED पथदीप व्यवस्था केली आहे.
शेणीत गावातील सर्व रस्ते विविध योजना निधी मधून सिमेंट-कॉंक्रिटचे पक्के रस्ते करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीने समाजकल्याण विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या योजना वापरून आदिवासी वस्ती व राजवाडा विभागात विविध विकास कामे केली आहेत.
गावातील बेघर कुटुंबांसाठी प्रधानमंत्री, रमाई, शबरी, मोदी आवास यांसारख्या शासन योजनांमधून गरजूना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नळाद्वारे गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत मार्फत विविध योजनांमधून सांडपाणी व्यवस्थापनासाठी संपूर्ण गावात भूमिगत गटार तसेच शोषखड्ड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गावात प्रति व्यक्ती एक झाड याप्रमाणे झाडे लावण्यात आली आहेत.
प्रति व्यक्ती एक झाड मोहिमे अंतर्गत गावातील सर्व विद्यार्थी तसेच सर्व कुटुंबांना फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली आहेत.
गावात प्रति व्यक्ती एक झाड याप्रमाणे झाडे लावण्यात आली आहेत.
| शिक्षण Education | आरोग्य Health | स्वच्छता Sanitation | रस्ते Roads | पाणी Water |
|---|---|---|---|---|
| प्राथमिक शाळा सुधारणा Primary School Improvement | आरोग्य केंद्र निर्माण Health Center Construction | स्वच्छता अभियान सुरू Cleanliness Drive Started | मुख्य रस्ता दुरुस्ती Main Road Repair | पाणीपुरवठा योजना Water Supply Scheme |
| कंप्युटर प्रयोगशाळा Computer Lab | आंबुलन्स सेवा Ambulance Service | कचरा व्यवस्थापन Waste Management | ग्रामीण रस्ते Rural Roads | बोरवेल योजना Borewell Scheme |
सुविधा: आधुनिक क्लासरूम, कंप्युटर प्रयोगशाळा, खेळाचे मैदान, पुस्तकालय
Facilities: Modern classrooms, computer lab, playground, library
विद्यार्थी संख्या: १५०+ विद्यार्थी
Student Strength: 150+ students
शिक्षक: ८ शिक्षक
Teachers: 8 teachers
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले शेणीत हे एक रमणीय व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव आपल्या स्वच्छ वातावरणासाठी, निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि साधेपणासाठी ओळखले जाते. गावातील लोक एकजुटीने आणि प्रेमाने जगतात.
शेणीत गावाची शैक्षणिक परंपरा, शेतकरी संस्कृती आणि सामाजिक उपक्रम यामुळे गावाचे विशेष स्थान आहे. येथील शेतकरी मेहनती व प्रामाणिक असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गावातील तरुण पिढी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
"शेणीत" हे फक्त एक गाव नसून निसर्ग, संस्कृती आणि प्रगती यांचा सुंदर संगम आहे. 🌿🏞️
QR कोड स्कॅन करून पेमेंट करा
No QR codes available
ग्रामपंचायत शेणीत, ता. इगतपुरी, जि. नाशिक
Gram Panchayat Shenit, Tal. Igatpuri, Dist. Nashik
+91-94035 15385
grampanchayat.shenit@gmail.com